खा. बाळ्यामामा म्हात्रे यांचे मुरबाडकडे दुर्लक्ष?
पाच महिन्यातून तीन वेळा मुरबाड दर्शन
मविआ ला याचा फटका बसणार?
मुरबाड : (सुभाष जाधव) अनपेक्षित म्हणजेच अवचांडी निवडून आलेले भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी पाच महिन्यात मुरबाडचे तीन वेळा दर्शन घेतले आहे, त्यामुळे त्यांचे मुरबाड विधानसभा मतदारसंघात दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे. ऐन विधानसभा निवडणुकीत या चर्चेला उधाण आल्याने याचा फटका मविआचे उमेदवार सुभाष पवार यांना फटका बसू शकतो याचीही जोरदार चर्चा सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीचे ४ जूनला निकाल लागले. यात भिवंडी लोकसभेत बाळ्यामामा म्हात्रे हे निवडून आले.त्यांनतरही मतदारांचे आभार मानणे सोडाच, मात्र चक्क दोन महिने म्हात्रे यांनी मुरबाडकराना तोंड दाखवले नव्हते. याची माध्यमांमध्ये चर्चा झाल्यानंन्तर त्यांनी मुरबाडमध्ये शिवनेरी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनतर मा. नगरध्यक्ष रामचंद्र दुधाळे यांच्या दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली.
याउलट मा.खा.कपिल पाटील केंद्रीय मंत्री असतानाही त्यांचे मुरबाडकडे विशेष लक्ष होते.आठवड्यातून किमान एकदा मुरबाडला भेट देऊन ते कार्यकर्ते व तालुक्यातील समस्या जाणून घेत होते. हल्लीही खासदार नसतानाही पाटील यांचे मुरबाडकडे विशेष लक्ष आहे.
तिसरी चक्कर खासदार म्हात्रे यांनी मारली ती उमेदवार सुभाष पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी.
यावेळी झालेल्या जाहीर सभेतही त्यांनी मोजून दीड मिनिट भाषण केले.यामुळे
विधानसभा निवडणुकीत थेट महाविकास आघाडीचे सुभाष पवार व महायुतीचे बलाढ्य उमेदवार किसन कथोरे यांच्यात लढत होत आहे. कथोरे यांना आमदारकी लढवण्याचा अनुभव दांडगा आहे. त्यातुलनेत पवार हे विधानसभा प्रथमच लढवत आहेत. मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतःच्या गटात ते काठावर निवडून आले होते. पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेली गर्दी पाहून झालेली हवा कायम राहिल की,हवा हवेत विरून जाईल याबाबत जरी येत्या काळात पहायला मिळणार असणार तरी सध्या खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या कधीतरीच्या मुरबाड दर्शनाची चर्चा आहे. ही चर्चा मविआचे उमेदवार पवार यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार हे मात्र नक्की.