आरोपींचा सहा महिने पोलिसांना गुंगारा?
पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहेत. - ॲड.प्रफुल रोकडे
मुरबाड: मुरबाड तालुक्यातील सरळगाव अट्रॉसिटी आणि हल्ल्याप्रकरणी आरोपी विष्णू घुडेचा अटकपूर्व जमीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.सरळगाव येथील ॲड.प्रफुल रोकडे यांच्यावर जानेवारी २०२५ मध्ये जीवघेणा हल्ला झाला होता.
प्रसिद्ध म्हसा यात्रेचे शुभेच्छा बॅनर सरळगाव बाजारपेठेत लावण्यावरून ॲड. प्रफुल रोकडे व येथीलच विष्णू घुडे यांच्यात वाद झाला होता.यात रोकडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद रोकडे यांनी दिली होती.
या प्रकरणी आरोपीना अटक न झाल्याने आरोपींच्या अटकेसाठी सरळगाव येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
सत्र न्यायालयाने घुडे याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर घुडे याने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र येथेही त्याचा त्याचा भाऊ अक्षय याचा अटकपूर्व जामीन फेटाळला.
पोलीस आरोपीना पाठीशी घालत आहेत. - ॲड.प्रफुल रोकडे
गेली सहा महिने आरोपी हे फरार असून पोलिसच आरोपीना पाठीशी घालत आहेत, असा आरोप रोकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.आरोपी हे साक्षीदाराना धमकावत आहेत.आरोपी मोकाट असल्याने माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
आरोपी राजकीय बळाचा वापर करून माझ्यावर दबाव टाकत असल्याचाही आरोप यावेळी रोकडे यांनी केला. आरोपीना लवकर अटक नं झाल्यास कुटुंबासमवेत उपोषणास बसण्याचा इशारा रोकडे यांना दिला आहे.तसेच आरोपीना फरार घोषित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी आर. पी. आय.सेक्युलरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने, युवा अध्यक्ष राजेश गायकवाड, सचिन धनगर, आदी उपस्थित होते.