मुरबाड दि. (सुभाष जाधव )
मुरबाड तालुका सरळगांव या ठिकाणी शिव सेना तालुका प्रमुख कांतीलाल कंटे यांच्या प्रमुख जबाबदारी ने मेळावा करण्यात आलं.
शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी कार्यकर्ते यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की आपण बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे मार्गदर्शना खाली तयार झालेले मावळे आहेत. गावच्या कार्यकर्त्यापासून ते मोठा कार्यकर्ता लाख मोलाचा असतो, आपले साहेब हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व ठाणे जिल्ह्यातील पालक मंत्री आहेत, आपल्याला काहीही कमी पडू देणार नाहीत, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी करिता तयारी करा. तालुका प्रमुख कांतीलाल कंटे यांनी फारच छान नियोजन केले होते.
या मेळाव्या साठी राज्य उपसचिव एकनाथ शेलार,जिल्हा प्रमुख अरविंद सावंत,ठाणे जिल्हा विभाग प्रमुख,एकनाथ भोईर,मुरबाड तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव,ज्यांनी कार्यक्रम नियोजन केला ते तालुका प्रमुख कांतीलाल कंटे,विधानसभा संपर्क प्रमुखकल्पेश धुमाळ, महिला आघाडी प्रमुख देवयानी दळवी, युवा सेना मुरबाड प्रमुख साईनाथ भोईर, नगरसेवक विनोद नार्वेकर, गटनेते नितीन टेलवणे, नगरसेवक अक्षय रोठे, नम्रता टेलवणे, जेष्ठ शिवसैनिक राम सासे, किशोर पवार आणि बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.