मुरबाड दि. 31(सुभाष जाधव )मुरबाड तालुक्यातील "आगाशी "गावचे सुपुत्र, चळवळीतील अभ्यासु वेक्तिमत्व, बहुजन समाज पार्टीचे ठाणे जिल्हा प्रभारी म्हणुन ते ठाणे जिल्हयात काम पाहत आहेत असे, राजेश शांताराम पवार यांची "दि भीमाई मागासवर्गीय ग्रामीण बिगरशेती सहकारी पथसंस्था मर्या. मुरबाड या संस्थेच्या दुसऱ्यांदा अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या सहकारी संस्थेच्या नोंदणी कृत उपविधि तिल तरतुदीनुसार चेअरमन व व्हा.चेअरमन या पदाच्या निवडी करीता सुजय भिकन पोटे, अध्यासी अधिकारी दि भिमाई मागासवर्गिय ग्रामीण बिगरशेती सहकारी पथसंस्था मर्या, मुरबाड, ता. मुरबाड, जि. ठाणे तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, मुरबाड यांच्या अध्यक्षतेखाली दि. ३० / ०७ / २० २५ रोजी दुपारी 0 १.०० वाजता सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, मुरबाड, ता.मुरबाड, जि. ठाणे, यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी संचालक मंडळ सभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व संचालकांना निवडीसाठी, निवडणूकीसाठी या कार्यालयात बोलावुन, त्याच दिवशी नामनिदेशन अर्ज वाटप, नामनिदेशन छाननी, वैध नामनिर्देशन पञाची यादी प्रसिद्धी, नामनिर्देशन पत्र माघार, अंतिम उमेदवाराची यादी जाहिर करणे, मतदान प्रक्रिया, मतमोजणी प्रकिया, व निवडु न आलेल्या पदाधिका ऱ्याबाबत निकाल घोषित करणे, एकाच दिवशी हि निवडणूक प्रक्रिया राबवुन सर्वानुमते व बिनविरोध राजेश शांताराम पवार यांची बिनविरोध चेअरमन पदी निवड करण्यात आली असून, मुरबाड तालुक्यात सर्वञ आनंद व कौतुकाचा वर्षाव होत आहे.