खासदार नसतानाही, मी मंजूर केलेलीच कामे भिवंडी मतदार संघात चालु आहेत!

लोकसभा निवडणूकिला एक वर्ष झाला पण एक रुपयाचे काम नाही!

मा. मंत्री कपिल पाटील यांची मिश्किल टिप्पणी!

मुरबाड : (सुभाष जाधव ) सध्या भिवंडी लोकसभा मतदार संघात विकासकामे सुरु आहेत, ती मीच मंजूर केलेली कामे आहेत.
विद्यमान लोकप्रतिनिधी हे पत्रकार परिषदा घेऊन पत्रे दिली, मात्र कामे काय केली याची माहिती देत नाहीत.असा टोला केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांना नाव नं घेता मुरबाडमध्ये लगावला.

शुक्रवारी माजी केंद्रीय मंत्री पाटील यांनी मुरबाडमध्ये त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी  बारवी धरण, नॅशनल हायवे, काळू धरण  विविध विषयांना हात घातला.

भिवंडी मतदारसंघात सध्या सुरु असलेली कामे मीच मंजूर केलेली आहेत.वर्षभर खासदार नसताना मी निधी आणला.
मी कामं पूर्णत्वास नेऊनच त्याची घोषणा करतो.पत्रे देऊन त्याचा मी पाठपुरावा करतो.

मी काम सुरु करा.. यातील मी नाही.. कुणाला टोणपा हाणला?

रस्त्याच्या कामात शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला नं मिळता कामे सुरु आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की मी कायम शेतकऱ्यांसोबत आहे.
'कामे सुरु करा.. यातील मी नाही.' असे उत्तर दिले. त्यामुळे हा टोणपा आ. कथोरे यांना मारल्याचे पत्रकारांच्या लक्षात आले.
माझ्याकडे आले असते तर वाचले असते : सुकळवाडी आत्महत्या प्रकरण

बारवी धरण प्रकल्पग्रस्त उघडा दाम्पत्याने अनुकंपा तत्वाने नोकरी मिळण्याची मागणी केली होती.मात्र नियमाप्रमाणे नसल्याने ती मागणी मान्य झाली नाही.मात्र कुणीतरी त्यांना आशा दाखवली.त्या नियमात बदल करता आला असता,ते माझ्याकडे आले असते तर त्यांना सर्व पटवून दिलं असतं. दोन जीव वाचले असते.

मुरबाड रेल्वे : प्रोसिजर तुम्ही लीक करता

मुरबाड रेल्वेबाबत विचारलं असता, ते म्हणाले की प्रोसिजर चालू आहे.मी आता खासदार असतो तर वेगाने हे झालं असतं.प्रोसिजर मी तुमच्यासमोर मांडता, आणि तुम्ही ते छापता. कोणतरी हिच माहिती लोकांना सांगून श्रेय लाटतो.असा चिमटा त्यांनी पत्रकारांना काढून रेल्वेचे श्रेय घेणाऱ्यांचे जणू प्रशासकीय ज्ञानच बाहेर काढले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सध्या राजकीय पक्ष तयारीला लागलेत.
शुक्रवारी कपिल पाटील यांच्या पत्रकार परिषद व कार्यकर्ता मेळाव्यात हा प्रत्यय दिसून आला.
मेळावाही भाजपचा होता की कपिल पाटील समर्थक यांचा, याचीही चर्चा सुरु होती.

Post a Comment

Previous Post Next Post