मा.सभापती स्वरा सचिन चौधरी यांनी मा. तहसीलदार यांना पीक विमा शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी!
मुरबाड दि. 31(सुभाष जाधव ) मुरबाड तालुका मा. सभापती स्वरा सचिन चौधरी यांनी, मुरबाड तालुक्यातील शेतकरी पीक नुकसान झालेले शेतकरी हे नुकसान भरपाई पासून वंचित राहिले आहेत व सन 2024-25 या हंगामात अवकाळी पाऊस/अल्पवृष्टि,/ अतिवृष्टि/ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मुरबाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे पिक पुर्णता नष्ट झाली होती सदर नुकसानीची शासनाच्या सुचनेप्रमाणे पंचनामे करून पात्र शेतकरी नुकसान होऊन सुध्या नुकसान भरपाई पासुन वंचित राहिल्याचे पाञ यादीतुन निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकरी वर्ग नुकसान होउन त्यांचे नुकसान होउन पंचनामे होऊन सुद्धा भरपाई न मिळाल्याने प्रचंड आर्थिक नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला असुन, तालुक्यातील सर्व वंचित शेतकऱ्यांची त्वरित पुर्नतपासणी करून पंचनामा यादी तपासणी करून त्यांना आर्थिक मदत तात्काळ मिळावी याकरिता मुरबाड पंचायत समिती मा. सभापती स्वरा सचिन चौधरी यांनी मा. तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले, यावेळी साजई सरपंच नमृता सासे, वैदेही पाटोळे, भाग्यश्री मार्के या वेळी उपस्थित होत्या.