जिल्हा परिषद शाळा तुळई, साकुर्ली, उचले येथे स्पंदन फाउंडेशन, चे उंबरे व मा. सभापती स्वरा सचिन चौधरी यांच्या उपस्थिती मध्ये शाळेय साहित्य वाटप!

जिल्हा परिषद शाळा, तुळई, साकुर्ली, उचले, येथे "स्पंदन फाउंडेशन "उंबरे सर व मा. सभापती स्वरा सचिन चौधरी यांच्या उपस्थिति मध्ये शाळेय शैक्षणिक साहित्य वाटप!
मुरबाड दि.1( सुभाष जाधव) मुरबाड तालुक्या मधील जिल्हा परिषद शाळा केंद्र तुळई, साकुर्ली, उचले, या ठिकाणी "स्पंदन फाउंडेशन "च्या वतिने, फाउंडेशन चे उंबरे सर यांच्या सहकार्याने या शाळांना शालेय शैक्षणिक सादित्य वह्या, पेन्सिल, शॉप नर, खोडरबर, व पि.टी चे कपडे, मुरबाड पंचायत समिती च्या मा. सभापती स्वरा सचिन चौधरी यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये शाळेय साहित्य वाटप करण्यात आले. स्पंदन फाउंडेशन चे काम अतिशय चांगले आहे, मागील वर्षी सुद्धा हा उपकृम राबविण्यात आला होता. मराठी शाळेतील विध्यार्थी यांना उर्जा व प्रेरणा मिळत आहे. मुलांच्या भावी आमुष्यात त्यांनी दान करावे. म्हणुन प्रेरणा देण्याचे काम स्पंदन फाउंडेशन करीत आहे. या प्रसंगी मा. आरोग्य कमचारी, रमेश चौधरी, जेष्ठ नागरिक भगवाण रांजणे, मा. केन्द्रप्रमुख वनमाला चौधरी, मुख्याध्यापक भाग्यश्री भोईर, राठोड सर, गायकवाड सर, व अन्य शिक्षक कर्मचारी, उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post